अर्थ – Marathi Poem

‘Arth’

आता उमगतो तो तुझा अर्थ …
बाकी तुझं अस्तित्व अजूनही अंधारातच आहे ….

कारण …
कारण मीच अंधारात उभा आहे ….
कोणी म्हणते तू रूपवान आहेस, तुझ्यामध्ये तेज आहे…
कोणी म्हणते डोळ्यांच्या सगळ्या पेशींना तू सुखावतेस…
आणि लगेच कोणी म्हणते मनाच्या सगळ्या पेशींना पण …

पण मला तर तरीही सगळा अंधारच दिसतो …
मग कोणी म्हणते अरे मन: चक्षुंनी बघ वगैरे…
तसं काहीसं मी करतो.. स्वतःला विसरून, भोळसट पणे…
पण सगळंच फुकट आणि व्यर्थ ….
आणि मग उमगतो तो तुझा अर्थ …

कधी वाटतं तू ना मध्यभागी आहेस वर्तुळाच्या….
आणि परीघावर माझ्यातलेच अनेक मी उभे आहेत …
वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचे अनेक मी …
काही सरळ काही वाकडे …
त्यांचे सगळे श्वासांचे लगाम हातात धरून नुसते फिरवत आहेस तू …
त्यातला एखादा येतोही तुझ्यापाशी …
उपभोगाची याचना करत तर कधी लालसा करत …
तरी त्याला तुझं शरीरच दिसत नाही …
आणि स्पर्शाची जाणीव देखील होत नाही …
आणि नंतर स्वतःची पण नाही …
मग लक्षात येत … कळून चुकतं…
काय स्वार्थ अन काय परार्थ….
आणि मग उमगतो तुझा अर्थ ….

मग अचानक संतापते मन कधी कधी फार कमी वेळा …
आमचे असे लगाम धरून आम्हाला चक्राकार फिरवणारी तू कोण ?
मग लगेच लक्षात येतं ….
मग त्याशिवाय आम्ही कोण …?
आणि मग पर्यायाने मी कोण …?
ठीकाय… नसेल माझ्याकडे उत्तर ह्याचे..  ह्या ठरलेल्या सोप्या प्रश्नाचे…
पण तरीपण अधिकार काय तुला तो लगाम धरण्याचा ….
मला गुलाम बनवण्याचा …
पण सरतेशेवटी चीड येतच नाही ….
कारण …
उलट  “एकटेपणाच्या स्वातंत्र्यावर ” , “भासमान  गुलामगिरीचा ” विजय समजावतो …
“गुलाम ” याचा अर्थ….
आणि मग उमगतो तो तुझा अर्थ ….

——————————————————————————————

All Rights Reserved © Shripad Deshpande

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s