इतका सरळ पण नसतो गं प्रवास संवादांचा..

Itka Saral Pan Nasto Ga Pravas Sukhacha
————————————————————————-

इतका सरळ पण नसतो गं प्रवास संवादांचा…
शब्दच हवे असतात असे नाही, हवे नसतात असेही नाही …
नजरच हवी असते असे नाही, हवी नसते असेही नाही…
हवे असते ते काहीही हवे नसणे ह्याचे प्रत्यंतर… दोघांनाही…
हवा असतो एक मैत्र अनुभव…
दोघांच्या आपापल्या क्षणांशी दोघांच्या एकत्र क्षणांचा….
म्हणूनच म्हणतो मी,
इतकाही सरळ नसतो गं प्रवास संवादांचा…पण एक सांगू;
फार नाही, हवी असते एक इर्षा समजून घेण्याची,
शब्दांना अबोलतेने आणि अबोलतेला शब्दांनी…
उत्तरांच्या मधल्या प्रश्नांना आणि प्रश्नांमधल्या देखील प्रश्नांना…
आणि खरे तर प्रश्न उत्तरे हवीत कशाला, ह्याच प्रश्नाला!!!
पण जसा सरींचा एक निर्मळ सूर लावत मेघ बोलतो ना ह्या मातीशी…

जसा सहज होतो मृद्गंध त्या जीवन थेंबांचा…
तेवढाच सोपा असतो गं प्रवास संवादांचा…
————————————————————————-
All Rights Reserved. © Shripad Deshpande
Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s