काय रे देवा – संदीप खरे

काय रे देवा

आता पुन्हा पाऊस येणार,
आकाश काळं निळ होणार
मग मातीला गंध सुटणार
मग मधेच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार
काय रे देवा!

मग ती आठवण कोणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपवणार
मग लपवूनही ते कोणालातरी कळावस वाटणार
मग ते कोणीतरी ओळखणार
मग मित्र असतील तर रडणार
नातेवाईक असतील तर चिडणार
नस्तच कळलं तर बरं असं वाटणार
आणि या सगळ्याशी तुला काहीच घेणं देणं नसणार..

मग त्याच वेळी नेमका दूर रेडीओ चालू असणार
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार
मग त्याला एस. डी. बर्मन ने चाल दिलेली असणार
मग ते साहिर ने लिहिलेलं असणार
मग ते लता ने गायलेलं असणार
मग तू हि आत्ता नेमकं हेच गाणं ऐकत असशील तर.. असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार
मग ना देणं ना घेणं फुकाचे कंदील लागणार
काय रे देवा..

मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार
मग त्याला आकाशाची आसव लगडणार
मग खिडकीत बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग पाच फूट पाच इंच देह अपुरा वाटणार
मग उर फुटून जावसं वाटणार
छाताडातून हृदय काढून त्या शुभ्र धरांखाली धरावास वाटणार
मग सारंच कसं मुर्खासारख उत्कट उत्कट होत जाणार
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार, बंद नाही पडणार
काय रे देवा!

पाऊस पडणार
मग हवा हिरवी होणार
मग पानापानात हिरवळ दाटणार
मग आपल्या मनाचं पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार
पण त्याला ते नाही जमणार
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार
मग ते ओशाळणार.. मग पुन्हा शरीराशी परत येणार
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिज मध्ये कुडमूडलेल आलं शोधणार
एस. डी. चं गाणं हि तोपर्यंत संपलेलं असणार
रेडीओ चा स्टॉक भरलेला असणार
मग तिच्या जागी ती असणार
मग माझ्या जागी मी असणार
कपातल वादळ गावाती चहाच्या चवीने पोटात निपचित झालेलं असणार

पाऊस गेल्या वर्षी हि पडला
पाऊस यंदा हि पडतो
पाऊस पुढच्या वर्षी हि पडणार!

काय रे देवा…!

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s