हे भलते अवघड असते! – संदीप खरे

He Bhalte Avghad Aste (Sandeep Khare)

Saying good bye to your loved ones is never easy. This poem by Mr. Sandeep Khare from the album ‘Ayushyavar Bolu Kahi’ makes me feel the pain..!

गाडी सुटलि, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटलि, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटलि, हाता मधुनि हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटुदे म्हणतले तरी तुटेना
कारे इतका लळा लावूनि नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली, फलाटावरी निश्वसांचा कचरा झाला
गाडी गेली, डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला..

हे भलते अवघड असते..
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जातांना
डोळ्यांच्या देखत आणि, नाहीसे लांब होतांना
डोळ्यातून अडवून पाणी हुंदका रोखून कंठी
तुम्ही केविलवाणे हसता
अन् तुम्हास नियती हस्ते
हे भलते अवघड असते

तरी असतो पकडायचा हातात रुमाल गुलाबी
वार्‍यावर फडकवतांना पायाची चालती गाडी
ती खिडकीतून बघणारी, अन् स्वता:मधे रमलेली
गजरा माळावा इतके
ती सहज अलविदा म्हणते
हे भलते अवघड असते..

तुम्ही म्हणता मानस आता, हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गावा येशील का तू
ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते
गजऱ्यातील दोन कळ्या अन
हलकेच ओंजळीत देते
हे भालते अवघड असते..

कळतेकी गेली वेळ, ना आता सुटणे गाठच
अपुल्याच मनातील स्वप्ने घेऊन मिटावी मूठ
ही मूठ उघडण्यापूर्वी, चल निघूया पाऊल म्हणते
पण पाऊल  निघण्यापूर्वी
गाडीच अचानक निघते
हे भालते अवघड असते..

परतीच्या वाटेवरती गुदमुरून जड पायांनी
ओठावर शिळ दिवाणी, बेफिकीर पण थरथरती
पण क्षण क्षण वाढत असते, अंतर हे तुमच्यामधले
मित्रांशी हसतानाही
हे दु:ख चरचरत असते
हे भलते अवघड असते…
हे भलते अवघड…….

– संदीप खरे

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s