Adhantari.. A Marathi poem

A beautiful poem I came across on the internet.. Very true about the lives of all those staying in foreign countries away from their loved ones..

आधांतरी…

VISA stamping झाल्यावर एकच धावपळ उडाली..
जे स्वप्नात पाहिलं होतं ते वास्तवात येताच उगीचच भीती वाटली.
भेटी-गाठी झाल्या, खरेदी झाली, सत्कार झाले, बैगहि भरली.
हि सगळी गडबड लग्नाच्या हि वर झाली.
घरातून पाय काढायच्या वेळी लक्षात आलं, आज्जी शी थोडं बोलायचं राहूनच गेलं.

स्वप्नांची दुनिया बाहेर होती,
आपुलकीची छाया घरातच होती.
काहीतरी मिळवण्यासाठी हे एवढं सारं सोडायचं?
आता या समोरच्या अंगणात आम्ही कधी खेळायचं?
आज अश्रूंचं वजन स्वप्नाहून हि जास्त झालेय..
नकोच हि अमेरिका असं हजारदा वाटून गेलं.

विमानतळावर मित्रमंडळी ची गर्दी झाली होती,
कधी नव्हे ते अंगार्याची पुडी मी खिशात ठेवली होती.
हसत होतो, बोलत होतो, सगळ्यांचा निरोप घेत होतो,
विमानतळावरच्या झगमगाटात हि मी एकटा पडलो होतो.
पाठ फिरवण्याची वेळ झाली, पप्पांची पापणी हलकीच गलबलली,
बरंच काही बोलून गेली.

सातासमुद्राकडे निघालायस, समृद्धी च्या राज्यात निघालायस,
यशाच्या शिखरावर चढताना इकडची काळजी करू नकोस,
पण पत्र लिहायलाही विसरू नकोस.
एका डोळ्यात कौतुक आहे, दुसऱ्या डोळ्यात काळजी,
तुझी आठवण खूप येईल रे दिवाळीच्या सकाळी,
व्यावसायिकतेच्या दुनियेत मनातला ओलावा हि जप,
जसा आहेस जाताना तसा परत येतानाही अस,
पाश्चात्य संस्कृतीत जरी झालास दंग, तोल नको सोडू.
विमानात मिळेलच सर्व,
पण डाव्या बाजूच्या कोपऱ्यात लाडू ठेवलेत बांधून, ते नको विसरू.

मित्र विचारतात मी काय मिस करतो?
कसं सांगू मी काय मिस करतो?
‘शाळेत फायनल ला पहिल्या बॉल वर ऑट झालो होतो,
गणपतीच्या मांडवात मुद्दाम भांडलो होतो.
फायनल इर च्या पार्टीत रंगलो होतो,
आईच्या हातचं कधी काळी मनसोक्त जेवलो होतो.’
कसं सांगू मी काय मिस करतो?

इथली सुसंस्कृत संपन्नता पाहून तोंडात बोटं जातात,
मात्र समृद्धीच्या देशातले लोकहि समाधानच शोधतात.
इथल्या इंग्रजाळलेल्या पंजाबी, गुजरात्यांच्या पोरांना पाहून डोक्यात सणक भरते.
मराठी मंडळीत हि इंग्रजी बोलणार्यांची अक्षरशः कीव येते.
मित्रत्वान वागतात, पण मित्र कधीच नसतात.
इथल्या सर्व गणितांची उत्तरं नेहमी शून्यच येतात.

म्हणून वाटतं देऊन टाकावेत जिंकलेले सारे किल्ले,
राहावं परत आपल्या देशात, मावळ्यांच्या संगतीत,
राजाभाऊ ची भेल खावी, फडतर्यांची मिसळ चापावी,
रंकाळ्यावर उगीचच इकडून तिकडे चक्कर मारावी,
राजाबाळ चं पान काहून कोल्हापुरी शिवी प्रेमानं द्यावी.
…. त्याची उधारी राहिलीच कि द्यायची!

परकं आभाळ सोडण्यासाठी जमीन आम्ही सोडली,
इथूनही आभाळ दिसतंय तेवढंच उंच..
पण आतातर पायाखाली जमीनही नाही राहिली.

कावळा राहिलो ना हंस,
झालो आम्ही आधांतरी..

 

Source:

 

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s