अप्रतीम व. पु. काळे

आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असच माणसाचं आहे… समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.

———————————————————————————————————

आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा… व्यक्तिचा कस लागावा. पडायचंच असेल, तर ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं.. म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल!

———————————————————————————————————

देव पाठीराखा असतो तेव्हाच असामान्य संकटं येतात. सामान्य संकटं निवारण्यात त्याचही देवत्व सिद्ध होणार नाही.

———————————————————————————————————

बाप मुलाला गाडी देऊ शकतो, झोप देऊ शकत नाही.
आई जेवण देऊ शकते, भूक देऊ शकत नाही.

———————————————————————————————————

प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं. हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं.

———————————————————————————————————

निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर? बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार?

———————————————————————————————————

एका माणसाच्या समस्येवर दुसर्‍या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोचू शकत नाही. तो स्व:तच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणार्‍या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसानेपडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.दुसर्‍याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून त्या समस्येकडे बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता.

———————————————————————————————————

प्रत्येक माणूस दुस-या माणसाला स्वत:सारखं करण्याच्या खटाटोपात असतो. संघर्षाचं हेच कारण आहे. खरं तर दुसरी व्यक्ती ही दुसरीच आहे. त्या वरच्या शक्तीचा तो वेगळा आविष्कार आहे. चैतन्याची ती अनंत रुपं आहेत. हे सगळं निर्माण करणा-याची साबणाची फॅक्टरी नाहीये. समोरच्या व्यक्तीनं तुमच्यासारखं का व्हायचं?

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s